Sridevi | RIP | श्रीदेवीला अखेरचा निरोप | त्यांच्या आवडत्या धवल रंगामध्ये | Lokmat Bollywood News

2021-09-13 1

श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रचंड आवडायचा. त्यांनी अनेक सिनेमांत पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहे. श्रीदेवी यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती दिली होती की, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंतिम संस्कारात त्यांना पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवावे. त्यामुळे त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे त्यांच्या कुटुंबियांनी ठरवले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव पांढऱ्या मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजवले जाणार आहे.अनेकदा श्रीदेवी यांना आपण सफेद रंगाच्या कपड्यांमध्ये पाहिलं होतं. त्यावरून आपल्याला अंदाज होताच की त्यांना तो रंग किती आवडत होता. श्रीदेवी यांचा ५४ व्या वर्षी आकस्मिक मृत्यू झाला. कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना त्यांचे निधन झाले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews